तृतीय पुण्यस्मरण

Standard

दादा सावली बनुन सोबत आहेत आपल्या,

प्रत्येक क्षणाला चालत आहेत आपल्यासोबत…

पाहत आहेत आपल्याला चालतांना,

बोलवा त्यांना…हळुच होकार देतील.

ते एेकताहेत प्रत्येक आवाज आपला,

आता फक्त एकच काम बाकी आहे.

चालायचंय आपल्याला मजबुत पावलांनी,

त्या वाटेवर जी  त्यांनी दाखवलीय आपल्याला.

चिंता नका करु चालात रहा…

कारण…,

दादा…सावली बुन सोबत आहेत आपल्या.

#जयंत.

Advertisements